रणवीर सिंहचं खऱ्या आयुष्यात आहे पाकिस्तानशी कनेक्शन, कोणाकडून मिळाला अभिनयाचा वारसा?
रणवीर सिंह सध्या 'धुरंधर २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्यानं पाकिस्तानमध्ये गुप्तहेर असलेल्या हमझा अलीचं पात्र साकारलं आहे. रणवीरचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे, कारण त्याची आजी चांद बर्क या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. चांद बर्क यांचे भाऊ सॅम्युअल मार्टिन बर्क पाकिस्तानचे राजदूत होते. चांद बर्क यांनी अनेक हिंदी व पंजाबी चित्रपटांत काम केलं. रणवीर सिंह त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे.