जान्हवी, सुहानासह होणाऱ्या तुलनेबाबत रवीना टंडनच्या लेकीचं स्पष्ट मत; राशा थडानी म्हणाली…
रवीना टंडनची लेक राशा थडानीने 'आझाद' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवी कपूर व सुहाना खान यांच्याशी होणाऱ्या तुलनेबाबत राशाने सांगितलं की, त्या तिच्यापेक्षा अनुभवी आहेत आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. 'आझाद' चित्रपटात राशाने अमन देवगणसह काम केलं, पण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खास कमाई केली नाही. मात्र, 'उई अम्मा' गाण्यातील राशाच्या नृत्याने खूप प्रशंसा मिळवली.