“रिया चक्रवर्ती वाघिणीसारखी लढली”, वकिलांची प्रतिक्रिया काय?
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने सादर केलेल्या अंतिम अहवालात रिया चक्रवर्तीला क्लिन चिट देण्यात आली आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचं नमूद आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, रिया निर्दोष असल्याचं सांगितलं. रियाला या प्रकरणात खूप त्रास सहन करावा लागला, पण ती वाघिणीसारखी लढली, असंही त्यांनी म्हटलं.