जया भादुरींच्या घरी झालेली बिग बी-रेखाची पहिली भेट, तिघे लाँग ड्राइव्हवर एकत्र जायचे
अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं प्रेमप्रकरण प्रसिद्ध आहे, पण त्यांची पहिली भेट जया भादुरींमुळे झाली होती. जया आणि रेखा चांगल्या मैत्रिणी होत्या आणि एकाच इमारतीत राहत होत्या. जया यशस्वी अभिनेत्री होत्या, तर रेखा करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होत्या. जया रेखाला करिअरबद्दल सल्ले द्यायच्या. रेखा आणि अमिताभ यांची पहिली भेट जयाच्या घरी झाली होती.