जर अहान शेट्टीने कमेंट केली तर…; रितेश देशमुखनं सुनील शेट्टींच्या मुलासाठी शेअर केला Video
सोशल मीडियावर "जर अहान शेट्टीनं कमेंट केली, तर..." हा ट्रेंड जोरात आहे. या ट्रेंडमध्ये लोक अहान शेट्टीकडून कमेंटची अपेक्षा करतात आणि बदल्यात 'बॉर्डर २' पाहण्याचं वचन देतात. अभिनेता रितेश देशमुखनेही हा ट्रेंड फॉलो करत एक मजेशीर रील शेअर केली आहे. अहान शेट्टीने सांगितलं की, हा ट्रेंड एका रीलमुळे सुरू झाला. 'बॉर्डर २' चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.