‘रामायण’साठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा दिला इशारा
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, तर रवी दुबे लक्ष्मणची भूमिका साकारणार आहेत. साई पल्लवीने 'रामायण'साठी मांसाहार सोडल्याच्या अफवांवर नाराजी व्यक्त केली आहे आणि अशा खोट्या बातम्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. साई पल्लवी शाकाहारीच आहे. 'रामायण' २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.