सैफचा हल्लेखोर बांगलादेशमधून भारतात कसा आला? सिमकार्ड कसे मिळवले? पोलिसांनी सांगितलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ विजय दास हा बांगलादेशी नागरिक आहे. सात महिन्यांपूर्वी डौकी नदी ओलांडून भारतात आलेला इस्लाम पश्चिम बंगालमध्ये काही आठवडे राहिला आणि नंतर मुंबईत नोकरीच्या शोधात आला. त्याने खोटे नाव वापरून सिमकार्ड मिळवले. पोलिसांनी त्याच्या फोनवरून बांगलादेशमधील कॉल्स शोधून त्याच्या बांगलादेशी नागरिकत्वाची पुष्टी केली.