सैफ अली खान प्रकरणातील आरोपीच्या वडिलांचा दावा, म्हणाले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा…
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता, ज्यात तो गंभीर जखमी झाला. ५ दिवसांच्या उपचारानंतर तो घरी परतला आहे. हल्लेखोर मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजादला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आरोपीच्या वडिलांनी दावा केला की पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती त्यांच्या मुलासारखी दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. तरीही, पोलिसांना सैफच्या घरातून मिळालेले बोटांचे ठसे आरोपीशी जुळत आहेत.