इन्स्टाग्रामच्या दुनियेत ‘नवाबा’ची एंट्री; सैफ अली खानच्या पहिल्या पोस्टने वेधले लक्ष
सैफ अली खानने पहिल्या पोस्टमध्ये पतौडी लायब्ररीमधील फोटो शेअर केला आहे. मागे ग्रंथालय असून तो सोफ्यावर बसून पुस्तक वाचत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्याने फॉर्मल लूक स्टाइल केला आहे. इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर करत सैफने लिहिले, “पतौडी लायब्ररी… पुस्तकांच्या मुखपृष्ठावरूनच त्यांचा अंदाज घेताना…".