आलिशान अपार्टमेंट, ८० कोटींचं फार्महाऊस, महागड्या गाड्या; सलमान खानची नेटवर्थ किती आहे?
सलमान खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. तीन दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या सलमानची एकूण संपत्ती २,९०० कोटी रुपये आहे. तो एका चित्रपटासाठी १००-१५० कोटी रुपये मानधन घेतो. त्याच्याकडे मुंबईतील आलिशान अपार्टमेंट्स, पनवेलमध्ये फार्महाऊस, महागड्या गाड्या आणि याच आहे. सलमान खान फिल्म्स आणि बिन ह्युमन ब्रँडद्वारेही तो कमाई करतो.