“…आणि शाहरुखने काठीने मारायला सुरुवात केली”, प्रसिद्ध कोरिओग्राफरने सांगितला ‘तो’ प्रसंग
शाहरुख खान आणि सलमान खान यांनी पहिल्यांदा 'करण अर्जुन' सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या सेटवर दोघांनी गावातील मुलींना त्रास देणाऱ्या मुलांशी मारामारी केली होती, असं कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी सांगितलं. 'भांगडा पाले' गाण्याच्या शूटिंगदरम्यान हा प्रसंग घडला. 'करण अर्जुन' १९९५ मध्ये प्रदर्शित झाला आणि यशस्वी ठरला. सध्या शाहरुख 'किंग' आणि सलमान 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात व्यग्र आहेत.