भाऊंची भेळ…; सलमान खानने स्वत:च्या हातांनी रितेशसाठी बनवली भेळ, जिनिलीयाने शेअर केला Video
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने २७ डिसेंबर रोजी पनवेल फार्महाऊसवर ६०वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकार सहभागी झाले होते. अभिनेत्री जिनिलीया देशमुखने पार्टीतील एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात सलमान खान स्वतः पाहुण्यांना पदार्थ वाढताना दिसतो. रितेश देशमुखसाठी त्याने खास 'भाऊंची भेल' बनवली. या व्हिडिओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.