‘धुरंधर २’मधील संजय दत्तच्या अभिनयाचं चौधरी अस्लम यांच्या पत्नीकडून कौतुक; म्हणाल्या…
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. संजय दत्तने पाकिस्तानी पोलीस अधिकारी चौधरी अस्लम यांची भूमिका साकारली आहे. चौधरी अस्लम यांच्या पत्नी नौरिन अस्लम यांनी संजय दत्तच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे, परंतु निर्मात्यांनी अस्लम यांचं व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्या पद्धतीने दाखवायला हवं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. 'धुरंधर'ने 'बाहुबली' आणि 'पुष्पा'चा रेकॉर्ड मोडला आहे.