प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या बायकोची पोस्ट; म्हणाली, “त्याची सवय…”
बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने १४ फेब्रुवारीला गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी मुंबईत लग्न केलं. त्याच्या पहिल्या बायको सान्या सागरने इन्स्टाग्रामवर एकटेपणाबद्दल पोस्ट केली आहे. प्रतीक व सान्या २०१९ मध्ये लग्न करून २०२३ मध्ये विभक्त झाले. सान्या सागर सध्या गोव्यात स्थायिक आहे आणि 'पार्टी टिल आय डाय' सीरिजमध्ये झळकली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.