शाहरुख खानला फकीराने दिलेला आशीर्वाद; अजमेर शरीफ दर्ग्यात मिळालेली ‘ही’ दुआ
अजमेर शरीफ दर्ग्याच्या आसपासच्या परिसरामध्ये शाहरुख खान हरवलेले पैसे शोधत असताना त्याला एक फकीर भेटला. यावेळी त्या फकिराने त्याला विचारले, 'काही हरवले आहे का?' त्यावर शाहरुखने 'हो…' असे उत्तर दिले. पण यानंतर फकीर स्वतः म्हणाला की, "पाच हजार हरवले आहेत ना?" हरवलेल्या पैशांचा थेट आकडा सांगितल्यामुळे शाहरुखसुद्धा आश्चर्यचकित झाला होता. पुढे फकीर म्हणाला, "इथे आलेला कोणीच रिकाम्या हातानं घरी जात नाही. आता पाच हजार गमावले आहेस, पुढे जाऊन ५०० कोटी कमावशील."