काळा गॉगल आणि हातावर आकर्षक टॅटू, शाहरुख खानच्या नव्या लूकवर चाहते फिदा
बॉलीवूडचा 'किंगखान' शाहरुख खानचा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमानतळावर गॉगल, टॅटू, स्लीवलेस बनियान आणि बिनी कॅपमध्ये दिसलेल्या शाहरुखच्या या लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे. 'जवान' आणि 'पठाण'च्या यशानंतर चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. शाहरुख लवकरच 'किंग' चित्रपटात दिसणार असून यात सुहाना खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.