“माझ्यासारख्या सुपरस्टारशी लग्न करशील का?”, शाहरुखने प्रियांकाला घातलेली लग्नाची मागणी?
२००० साली मिस इंडिया स्पर्धेत १७ वर्षांच्या प्रियांका चोप्राला परीक्षक शाहरुख खानने लग्नाबाबत तीन पर्याय दिले: भारतीय क्रीडापटू, श्रीमंत व्यावसायिक किंवा हिंदी चित्रपटातील सुपरस्टार. प्रियांकाने भारतीय क्रीडापटूची निवड केली, कारण तिला देशाचा अभिमान वाढवणाऱ्या व्यक्तीशी लग्न करायला आवडेल असं तिने सांगितलं. या स्पर्धेत ती प्रथम उपविजेती ठरली आणि नंतर मिस वर्ल्डचा किताब जिंकला.