“तू खूप कुरूप…”, शाहरुखला हेमा मालिनी म्हणालेल्या असं काही…; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
शाहरुख खानचा प्रवास संघर्षमय होता. दिल्लीहून मुंबईत येऊन त्याने मेहनतीने आपले साम्राज्य निर्माण केले. शाहरुखला पहिला ब्रेक देणाऱ्या हेमा मालिनी यांनी त्याला कुरूप म्हटले होते. निर्माता विवेक वासवानी यांनी सांगितले की, शाहरुखला 'दिल आशना है' चित्रपटासाठी ५०,००० रुपयांवर साइन केले. हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण शाहरुखने नंतर यशस्वी कारकीर्द घडवली.