“रश्मिका हिंदी चित्रपट तुझ्यासाठी नाही”, ‘कॉकटेल २’ पाहून शोभा डे यांनी व्यक्त केली नाराजी
'कॉकटेल २' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असला तरी प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. लेखिका शोभा डे यांनी चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी रश्मिका मंदानाला हिंदी चित्रपटांसाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. चित्रपटाच्या कथानकावर टीका करताना त्यांनी शाहिद कपूरचं काम चांगलं असल्याचं सांगितलं. शोभा डे यांच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.