नणंद व भाचीबरोबरचे फोटो का पोस्ट करत नाही? ऐश्वर्या रायची वहिनी श्रीमा म्हणाली….
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची वहिनी श्रीमा राय ही एक लोकप्रिय ब्युटी इंफ्लुएन्सर आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून, कुटुंबाचे फोटो शेअर करते. मात्र, तिच्या अकाउंटवर ऐश्वर्या राय व आराध्या बच्चनचे फोटो नसल्याने वादाच्या चर्चा होतात. श्रीमाने स्पष्ट केले की, तिचं ऐश्वर्याशी चांगलं नातं आहे, पण लोकांनी तिच्या अकाउंटवर तिलाच पाहावं, असं तिला वाटतं.