२००४ च्या कराची बॉम्बस्फोटातून थोडक्यात वाचलेला सोनू निगम, जुना व्हिडीओ व्हायरल
सोनू निगमने २००४ साली कराचीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्या स्फोटातून तो थोडक्यात बचावला होता. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने त्याला कशाप्रकारे वाचवलं हे दाखवलं आहे. स्फोटाच्या काही तासांनंतर सोनूने कडक सुरक्षा व्यवस्थेत परफॉर्मन्स केला होता. या घटनेमुळे सोनू आणि आयोजक फुरकान सिद्दीकी यांच्यात खास नातं निर्माण झालं.