“आजही आठवण येते”, स्मिता पाटील यांच्या ७१व्या जयंतीनिमित्त पती राज बब्बर यांची पोस्ट
ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर यांनी दिवंगत पत्नी स्मिता पाटील यांच्या ७१व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी इन्स्टाग्रामवर स्मिता यांचा फोटो शेअर करत त्यांच्या असामान्य अभिनयकौशल्य आणि प्रेमळ स्वभावाबद्दल आदरांजली वाहिली. स्मिता यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत आत्मा ओतला, असे त्यांनी म्हटले. स्मिता यांचा कलात्मक वारसा आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो.