प्रेक्षकांच्या गर्दीत हरवला लहान मुलगा; सोनू निगमने केलं असं काही की…; गायकाचं होतंय कौतुक
बॉलीवूड गायक सोनू निगमने हुबळीमधील कॉन्सर्टमध्ये हरवलेल्या श्री साई नावाच्या मुलाला शोधून त्याची भीती घालवली. सोनूने स्टेजवर त्या मुलाला समजावत मजेशीर गाणं गात त्याला शांत केलं. मुलाच्या काकांना शोधून त्याच्या स्वाधीन केलं. सोनूच्या संवेदनशीलतेचं कौतुक करत चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला आहे.