सोनू सूदच्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल डॉक्टर म्हणाले, “रुग्णालयात आणलं तेव्हा तिघेही…”
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा २४ मार्च रोजी रात्री मुंबई-नागपूर महामार्गावर अपघात झाला. या अपघातात सोनाली, तिची बहीण आणि भाचा जखमी झाले. त्यांच्यावर नागपुरातील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, तिघांची प्रकृती स्थिर आहे. सोनालीचा भाचा डिस्चार्ज झाला असून सोनाली आणि तिची बहीण अद्याप रुग्णालयात आहेत. सोनू सूदने सांगितलं की, सोनाली चमत्कारिकरित्या बचावली आहे.