‘लगान’ फेम मराठी अभिनेत्रीने ६०व्या वर्षी केलेलं लग्न, वाचा रंजक प्रेमकहाणी
९०च्या दशकातील अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी ६०व्या वर्षी लग्न केलं. त्यांनी करिअरमध्ये स्थिरावल्यानंतर योग्य जोडीदार मिळाल्यावरच लग्नाचा निर्णय घेतला. फेसबुकवर ओळख झाल्यानंतर ७५ दिवसांत त्यांनी शास्त्रज्ञ अतुल गुर्टू यांच्याशी लग्न केलं. सुहासिनी यांनी त्यांच्या जोडीदारामध्ये समानता, धार्मिकता नसणं आणि आदर असणं या गुणांची अपेक्षा ठेवली होती. आज त्या ७५ वर्षांच्या असून अतुल गुर्टू यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.