“परेश रावल यांच्याशिवाय ‘हेरा फेरी ३’…”, सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया
'हेरा फेरी ३' चित्रपटाची घोषणा झाल्याने चाहत्यांमध्ये आनंद होता. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल हे त्रिकूट पुन्हा एकत्र येणार होते. परंतु, परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. सुनील शेट्टी यांनी परेश रावल यांच्या एक्झिटवर प्रतिक्रिया देत म्हटलं की, "परेश रावल यांच्याशिवाय 'हेरा फेरी ३' बनवणं अशक्य आहे."