सुनीता आहुजांना ‘वन नाइट स्टँड’साठी कोणाची निवड कराल? विचारल्यानंतर म्हणाल्या….
बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी शाहरुख खानचं कौतुक केलं आणि वन नाइट स्टँडसाठी कोणाची निवड कराल विचारल्यानंतर पहिली पसंती शाहरुख खानच असल्याचं स्पष्ट केलं. 'Why Not with MNL' सीझन ३मधील रॅपिड-फायर सेगमेंटमध्ये त्यांनी गोविंदाबद्दलही भाष्य केलं. सुनीता यांनी गोविंदावर एकतर्फी प्रेम असल्याचं सांगितलं. इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींबद्दल बोलताना त्यांनी त्यांना साप म्हटलं. गोविंदाच्या सहअभिनेत्री कधी त्यांच्या घरी आल्या नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.