गोविंदाने कोमल राणी स्वर्णकारबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याने भडकल्या सुनीता आहुजा
अभिनेता गोविंदाने सहकलाकार अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गोविंदाने कोमल राणी स्वर्णकारबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यावर सुनीता आहुजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनीता आहुजा म्हणाल्या, "माणसांवर कितीही प्रेम करा, काहीच उपयोग नाहीये. माणसे धोकाच देतात. श्वानांवर प्रेम करून बघा, ते कायम आपल्या जवळ राहतात. माणसांवर नाही तर जनावरांवर प्रेम करा. माणसे धोकेबाज असतात, त्यांच्यापेक्षा जास्त चांगले तर प्राणी आहेत."