‘धुरंधर’नंतर आता ‘बॉर्डर २’वर ‘या’ देशांनी घातली बंदी; कारण काय? जाणून घ्या…
सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ट्रेलरला दमदार प्रतिसाद मिळाला असून ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. मात्र, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, ओमान, कतार आणि यूएईमध्ये पाकिस्तान विरोधी विषयामुळे हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. 'बॉर्डर २'चे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले असून सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत.