“बॉर्डरच्या वेळी आमच्यात खूप…”, सनी देओलने सांगितला अक्षय खन्नाबरोबरचा जुना किस्सा
सनी देओल आणि अक्षय खन्ना हे बॉलीवूडमधील दमदार अभिनेते आहेत. अलीकडेच ते 'धुरंधर' आणि 'बॉर्डर २' चित्रपटांमुळे चर्चेत होते. आता ते 'इक्का' या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ट्रेलर लाँच कार्यक्रमात सनीने अक्षयचे कौतुक केलं. सनीने त्यांच्या 'बॉर्डर' चित्रपटातील आठवणींनाही उजाळा दिला.