विवेक ओबेरॉयला काम मिळवून देण्यासाठी वडील सुरेश ओबेरॉय यांना करावा लागलेला संघर्ष
विवेक हा ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे. विवेकने राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र, सुरुवातीला काम मिळवण्यासाठी विवेक ओबेरॉयला संघर्ष करावा लागला. फक्त विवेकलाच नाही, त्याच्या वडिलांनाही त्याला काम मिळवून देण्यासाठी कष्ट घ्यावे लागले.