ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटिया व विजय वर्माने साजरी केली धुळवड! पाहा व्हिडीओ
गेल्या काही दिवसांपासून तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा खूप चर्चेत आहेत आणि चर्चेत कारण आहे ब्रेकअप. दोघांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. पण, अजूनपर्यंत दोघांनी या ब्रेकअपच्या चर्चेबाबत मौन धारण केलं आहे. तमन्ना व विजयची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटिया आणि विजय वर्माने रवीना टंडनच्या घरी एकत्र धुळवड साजरी केली. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.