अमिताभ बच्चन-जया यांचे आंतरजातीय लग्न लावण्यास भटजीने दिलेला नकार
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी १९७३ मध्ये लग्न केले. जया यांचे वडील तरूण कुमार भादुरी यांच्या मते, ते दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या लग्नाचा निर्णय सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. भादुरी यांनी अमिताभ यांच्या जिद्दीचे कौतुक केले आणि जात वेगळ्या असल्याने विरोधाच्या अफवा फेटाळल्या. लग्नाच्या विधी बंगाली पद्धतीने पार पडले होते, पण जया व अमिताभ वेगवेगळ्या जातीचे असल्याने भटजीने लग्न लावण्यास नकार दिला होता.