Chhaava: ‘छावा’ने मोडला शाहरुखच्या ‘पठाण’चा रेकॉर्ड, २९ दिवसांचे कलेक्शन किती? जाणून घ्या
अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २९ दिवसांत ५४६ कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्याने शाहरुख खानच्या 'पठाण'ला मागे टाकले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. 'छावा'ने पाचव्या गुरुवारी ४ कोटी आणि शुक्रवारी ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली. वीकेंडला हा चित्रपट ५५० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे.