विकी कौशलचा मराठी चित्रपटाला पाठिंबा; ऋजुता देशमुखच्या लेकीच्या सिनेमाचं केलं कौतुक
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने 'एप्रिल मे ९९' या मराठी चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. विकीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित झाला असून, त्यात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर आणि साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साजिरी जोशी ही अभिनेत्री ऋजुता देशमुखची मुलगी असून, ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.