विकी कौशल ‘या’ कारणामुळे शैलेश लोढांच्या लेकीच्या लग्नात होता हजर
हिंदी टेलिव्हिजनवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील शैलेश लोढा यांची लेक स्वरा लोढाचं राजस्थानमध्ये भव्य लग्न पार पडलं. या सोहळ्यात बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने हजेरी लावली आणि शैलेश यांना भावनिक आधार दिला. विकी आणि शैलेश यांची जुनी मैत्री असल्याने विकीने हा सहभाग घेतला. विकीच्या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक झालं.