‘धुरंधर २’मध्ये विकी कौशल करणार एन्ट्री? गेल्या वर्षीच पूर्ण केलंय शूटिंग
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाने ४७ दिवसांत भारतात ८२८.१० कोटी आणि जगभरात १२८७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा सीक्वेल 'धुरंधर: द रिवेंज' १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय खन्ना फक्त फ्लॅशबॅक सीनमध्ये दिसणार आहे. विकी कौशल 'उरी'मधील मेजर विहान शेरगिलची भूमिका साकारणार आहे.