विकी कौशल व कतरिना कैफचा फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “ट्रोलिंग फक्त त्याच्या पत्नीसाठीच…”
Vicky Kaushals latest photo with Katrina Kaif sparks debate: विकी कौशल व कतरिना कैफ सध्या लंडनला गेले आहेत. त्यावेळी एका चाहत्याने त्यांचा एक फोटो काढला. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या जोडप्याचा लूक समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी पुरुष आणि महिलांना त्यांच्या दिसण्यावरुन वेगळ्या पद्धतीने वागवले जाते, त्यांच्यात दुजाभाव केला जातो. महिला व पुरुषांना वेगवेगळे निकष लावले जातात, असे म्हणले आहे.