‘विवाह’मधील ‘छोटी’ १९ वर्षांनी कशी दिसते? काय करते? जाणून घ्या
'विवाह' चित्रपटातील 'छोटी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता प्रकाश आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे ९३ हजार फॉलोअर्स आहेत. अमृताने ४ वर्षांची असताना करिअरची सुरुवात केली होती आणि 'तुम बिन' चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. तिने मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अमृताचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे आणि ती टीव्ही जाहिरातींची निर्मिती करते.