‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, विवेक अग्निहोत्री करणार दिग्दर्शन
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'द कश्मीर फाइल्स', 'द ताश्कंद फाइल्स', 'द बंगाल फाइल्स' नंतर त्यांच्या नवीन चित्रपट 'ऑपरेशन सिंदूर'ची घोषणा केली आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी हल्ल्याच्या सत्यघटनेवर आधारित आहे. भूषण कुमार यांच्या 'टी-सीरीज' आणि विवेक अग्निहोत्री यांच्या 'आय एम बुद्धा प्रोडक्शन्स'ने संयुक्तपणे निर्मिती केली आहे.