“अमेरिकन लोकांना काश्मीरबद्दल…”, विवेक अग्निहोत्रींचं भाष्य, म्हणाले…
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अमेरिकन लोकांना काश्मीर आणि काश्मीरच्या समस्यांबद्दल माहिती नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकन लोकांना काश्मीरबद्दल अजिबात माहीत नाही. याबद्दल ते म्हणाले, "मी नुकताच अमेरिकेहून परतलो आहे आणि मला माहीत आहे की, त्यांना या प्रदेशाबद्दल किंवा हा प्रदेश कसा चालतो? याबद्दल अजिबात कल्पना नाही". पुढे त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलही सांगितलं. 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या यशानंतर, विवेक अग्निहोत्री यांचा आगामी नवीन चित्रपट चर्चेत आहे.