…म्हणून ‘पत्थर के फूल’ चित्रपटानंतर सलमान खानबरोबर काम केलं नाही; निर्मात्यांचा खुलासा
निर्माते विवेक वासवानी यांनी 'पत्थर के फूल' चित्रपटानंतर सलमान खानसोबत पुन्हा काम का केले नाही, याचे कारण स्पष्ट केले. वासवानी यांनी सांगितले की, त्यांना शिस्तबद्ध वातावरणात काम करायला आवडते आणि बेशिस्तपणा सहन होत नाही. सलमानने सूरज बडजात्या किंवा संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या निर्मात्यांसोबत जसे प्रोफेशनल वागतो, तसे वागल्यासच ते पुन्हा सलमानसोबत काम करतील.