स्मिता पाटील यांना अचानक झापड मारली अन्…; अमोल पालेकरांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी श्याम बेनेगल यांच्या 'भूमिका' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक प्रसंग सांगितला. बेनेगल यांनी पालेकरांना अभिनेत्री स्मिता पाटील यांना नकळत झापड मारायला सांगितलं होतं, ज्याला पालेकरांनी विरोध केला. मात्र, बेनेगल यांच्या आग्रहामुळे त्यांनी ते केलं. या प्रसंगानंतर स्मिता पाटील संतापल्या आणि दोघेही रडले. पालेकरांनी या घटनेतून कलाकारांमधील संमती आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केलं.