Video : “उद्धट मुलगा…”, अभिनेत्यावर संतापलेला गोविंदा, नेमकं काय घडलेलं? वाचा…
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये पाहुणा म्हणून गेला होता. शोच्या होस्ट राघव जुयालने केलेल्या मस्करीमुळे गोविंदा संतापला आणि त्याने लाईव्ह शोमध्ये राघववर राग व्यक्त केला. राघवने नंतर माफी मागितली आणि शो सुरू ठेवला. राघवने सांगितले की, गोविंदा मोठे कलाकार आहेत आणि त्यांचा राग त्याला समजतो.