“ती माझी मुलगी नाही,” ऐश्वर्या रायबद्दल असं का म्हणाल्या होत्या जया बच्चन?
जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. जया बच्चन यांनी एकदा सून ऐश्वर्या रायबद्दल वक्तव्य केले होते. त्यावेळी मुलगी व सून यात फरक असतो, असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच ऐश्वर्या राय माझी मुलगी नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी हे वक्तव्य एका प्रश्नाचं उत्तर देताना केलं होतं.