‘आम्ही काय गुलाम आहोत का?’, ‘टाटा केमिकल्स’च्या विरोधात केनियामध्ये रोष
केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी टाटा केमिकल्सला देशातून बाहेर जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी टाटांवर स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यात अपयश आल्याचा आरोप केला आहे. काजियाडो प्रांतात स्थानिक विकासासाठी काहीही न केल्यामुळे रुटो यांनी टाटांना निघून जाण्यास सांगितले. टाटा केमिकल्सने हे आरोप फेटाळले असून सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला आहे.