बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; पण ८ तासांचा दिवस, ५ दिवसांचा आठवडा नेमका केव्हा सुरू झाला?
‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (UFBU) सोमवारपासून (२८ सप्टेंबर) बुधवारपर्यंत संपाची घोषणा केली होती. मात्र हा संप स्थगित करण्यात आला आहे. सध्याचा सहा दिवसांचा कामकाजाचा आठवडा बदलून तो पाच दिवसांचा करावा, ही त्यांच्या विविध मागण्यांपैकी प्रमुख मागणी आहे. जगभरातील विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी कामाचे दिवस कमी करण्याची मागणी केली आहे. काही देशांमध्ये तर चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचाही विचार केला गेला आहे. मात्र, या सर्व मागण्यांच्या मुळाशी आज रूढ झालेली कामाची एक विशिष्ट व्यवस्था आहे.