सुभाष चंद्रा यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; १,३२२ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी कारवाई
'झी' समूहाचे संस्थापक आणि 'एस्सेल समूहा'चे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची १,३२२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सुभाष चंद्रा आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.