८७१ रुपयांचा शेअर थेट १२०० रुपयांवर! धूत ट्रान्समिशनचे गुंतवणूकदार पहिल्यास दिवशी मालामाल
धूत ट्रान्समिशनच्या शेअर्सनी सोमवारी शेअर बाजारात ३८% प्रीमियमवर दमदार पदार्पण केले. आयपीओ १०-१२ ऑगस्ट दरम्यान खुला होता आणि ७४.२१ पट मागणी नोंदवली गेली. कंपनीने ७२ अँकर गुंतवणूकदारांकडून ९१८.२७ कोटी रुपये उभारले. धूत ट्रान्समिशन भारतातील ऑटोमोटिव्ह इकोसिस्टममधील प्रमुख कंपनी असून, २०२६ आर्थिक वर्षात ३१% उत्पन्न वाढ आणि १२% नफा वाढ नोंदवला आहे.