रिलायन्सची अमेरिकेतील तेल शुद्धीकरण प्रकल्पात मोठी गुंतवणूक; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये ५० वर्षांतील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना उभारण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पाठिंब्याने उभा राहत आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प अमेरिकेच्या ऊर्जा वर्चस्वासाठी महत्त्वाचा आहे आणि यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत अब्जावधी डॉलर्सची भर पडेल.